इंदापूर, १ ऑगस्ट २०२० : कोरोनामुळे अनेक सण, उत्सव आणि धार्मिक कार्यक्रम यावर बंधने आलेली आहेत. त्यामुळे आज बकरी ईद देखील अतिशय साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. इंदापूर मधील ईदगाह मैदान दरवर्षी ईद निमित्त गजबजलेले असते. तसेच ईदच्या पार्श्वभूमीवर ईदगाह मैदानाची साफसफाई केले जाते परंतु यंदा कोरोनामुळे प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मुस्लिम बांधवांनी बकरी ईदची नमाज घरातूनच पठण करून अगदी साध्या पद्धतीने साजरी ईद साजरी केली.
शहरातील या मैदानावर ईद निमित्त हजारो मुस्लिम बांधव नमाज पठण करतात. या मैदानावर ईद निमित्त अनेक बांधव एकमेकांना शुभेच्छा देतात तसेच हा परिसर गजबजलेला असतो. पण यंदा या मैदानावर कोणीही उपस्थित नव्हते.
यावेळी न्यूज अनकट शी बोलताना अन्वर शिकलगार म्हणाले की इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना असेल की आम्ही इदगाह वर येऊन नमाज पठण केले नाही. राष्ट्रीय आपत्तीमध्ये आम्ही देखील सहभाग घेतला असून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार आम्ही घरातूनच नमाज पठण करून ईद साजरी केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी