पीक विम्याबाबत प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शेतकरी संघटनेच्या वतीने जालन्यात खसखस पेरून अफुची लागवड

जालना, २६ डिसेंबर २०२३ : जालना जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्याने हरभरा पिकासंह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी लागवडीसाठी केलेला खर्च वाया गेला आणि पीकही हातचे गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. जिल्ह्यातील शेतकरी एवढ्या संकटात सापडला असताना नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे देखील प्रशासन करत नाही, म्हणून आज शेतकरी संघटनेच्या वतीने जालन्यातील मोतीगव्हान येथे खसखस पिकांची लागवड करून शासनाचा निषेध करण्यात आला.

दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदन देत नुकसानभरपाई आणि पंचनामे करण्याची मागणी शेतकरी संघटनेने केली होती. त्यावेळी २ दिवसात प्रशासनाने हालचाल न केल्यास आज रविवारी अफु म्हणजेच खसखसची पेरणी करण्याचा इशारा संघटनेने दिला होता. प्रशासनाने या मागण्यांना केराची टोपली दाखवल्याने अखेर आज शेतकऱ्यांनी खसखस पेरून अनोखे आंदोलन केले आहे. आता प्रशासन काय पाऊल उचलते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा