रिलायन्स जिओच्या या निर्णयामुळं दूरसंचार कंपन्यांचे शेअर्स ढासळले…!

मुंबई, २४ सप्टेंबर २०२०: भारतीय बाजारपेठेत एअरटेल आणि जिओ या दूरसंचार कंपन्यांमधे थेट स्पर्धा आहे. बुधवारी एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया च्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. तर रिलायन्स शेअर मध्ये मोठी वाढ दिसून आली. कारण, रिलायन्स जिओनं एक मजेदार पाच पोस्टपेड प्लस प्लॅन जाहीर केले आहेत.

वास्तविक, बुधवारी मार्केट सुरू असताना एअरटेलच्या शेअर्समध्ये १० टक्क्यांनी घसरण झाली. शेअर्सही ४२३.९५ रुपयांच्या खालच्या पातळीला जाऊन पोहोचला. तर मार्केट बंद होत असताना तो ८.८१ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. त्याच वेळी, व्होडा-आयडियाच्या शेअर्समध्ये १४.०५ टक्क्यांपर्यंत घसरण दिसून आली. शेवटी, ते सुमारे १० टक्क्यांनी घसरले.

असे म्हटले जात आहे की रिलायन्स जिओच्या विलक्षण पोस्टपेड योजनांच्या घोषणेमुळे एअरटेल आणि व्होडाच्या शेअर्समध्ये घट झाली आहे. या नव्या जिओच्या योजना मूळे एअरटेल आणि व्होडा-आयडिया समोर एक कठीण आव्हान उभे आहे.

रिलायन्स जिओने ३९९ रुपयांपासून ते १,४९९ रुपयांपर्यंत नवीन पाच पोस्टपेड योजना आणण्याची घोषणा केलीय. या जिओ पोस्टपेड योजनांना नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि डिस्ने प्लस हॉटस्टारची विनामूल्य सदस्यता मिळेल. याबरोबरच ग्राहकांना आणखी काही फायदेही मिळतील.

जिओ पोस्टपेड प्लस २४ सप्टेंबरपासून जिओ स्टोअर आणि होम डिलिव्हरीद्वारे उपलब्ध होईल. तसेच, जिओ ६५०+ लाइव्ह टीव्ही चॅनेल, व्हिडिओ कंटेट्स, ५० दशलक्ष गाणी आणि ३००+ वर्तमानपत्रांसह जियो अॅप सेवा देखील देत आहे. नवीन जिओस्टोपेड योजना देखील संपूर्ण कुटुंबासाठी कौटुंबिक योजनांसह येईल. त्यासाठी प्रत्येक कनेक्शनसाठी २५० रुपये द्यावे लागतील. तसेच, ५०० जीबी पर्यंतचा डेटा रोलओव्हर आणि भारत आणि परदेशात वायफाय कॉलिंगचा देखील फायदा होईल.

याशिवाय एअरटेल आणि वोडा आयडियाच्या समभागांवर दबाव आणण्याचे कारण एजीआर पेमेंट प्रकरणही आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीस टेलिकॉम कंपन्यांना एजीआर थकबाकी म्हणून किमान १२,९२१ कोटी रुपये द्यावे लागतील. त्यापैकी ८० टक्के रक्कम भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाला द्यावी लागेल. रिलायन्स जिओ ही एकमेव कंपनी आहे जीची एजीआर थकबाकी नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा