पिंपरी चिंचवड मध्ये ‘डफली बजाव’ आंदोलन

पिंपरी चिंचवड, १२ ऑगस्ट २०२०: आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी दोन दिवसांपूर्वी ( दि.१० ऑगस्ट ) केलेल्या आदेशाप्रमाणे आज राज्यभर मोठ्या प्रमाणात ‘डफली बजाव ‘ आंदोलने सुरू झाली आहेत. वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने सुद्धा आज पिंपरी चिंचवड वल्लभनगर एसटी बस डेपो येथे ‘डफली बजाव’ आंदोलन करण्यात आले .

सतत असणाऱ्या लॉकडाऊन मुळे व्यापारी वर्ग व सर्वसामान्य जनतेची आर्थिक बाजू ढासळलेली आहे. सरकार या बाबतीत गांभीर्याने विचार करत नसून वंचित बहुजन आघाडीने सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार करत हे आंदोलन सुरू केले आहे. गरीब, शोषित, वंचित जनतेला लॉकडाऊनचा माध्यमातून छळणाऱ्या सरकारला जाब विचारण्याकरिता आंदोलनाची सुरुवात झाली आहे.

लॉकडाऊनच्या विरोधात राज्य सरचिटणीस मा. अनिल जाधव यांच्या प्रमुख नेतृत्वात व शहर अध्यक्ष देवेंद्र तायडे व युवक आघाडी अध्यक्ष गुलाब पानपाटील यांच्या उपस्थितीत हे आंदोलन पार पडले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा