विहिरीचे बांधकाम सुरू असताना रिंग पडून मुरुम ढासळला, ढिगाऱ्याखाली चार कामगार गाडले गेले

पुणे, २ ऑगस्ट २०२३ : पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी गावच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली आहे. विहिरीचे बांधकाम सुरू असताना रिंग पडून मुरुम ढासळला. यावेळी ढिगाऱ्याखाली चार कामगार गाडले गेल्याची घटना घडली आहे. काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. सदर विहिर १२७ फूट खोल आहे. पोकलेनच्या सहाय्याने माती काढण्याचे काम सुरू आहे. बचावकार्यासाठी एनडीआरएफची टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

इंदापूर तालुक्यातील सणसर गावातील रहिवासी विजय अंबादास क्षिरसागर यांची म्हसोबावाडी गावच्या हद्दीत कवडे वस्ती लगत जमिन आहे. या जमिनीत विहिरीच्या बांधकामाचे काम सुरु आहे. सदरची विहिर ही १२० फूट व्यासाची आणि १२७ फूट खोल आहे. या विहिरीचे बांधकामाचे काम सुरु असताना काल रात्री त्यामध्ये रिंग पडली आणि मुरुम ढासळला. यामुळे ढिगाऱ्याखाली चार कामगार गाडले गेले आहेत.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी, तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोकलेन मशिनच्या सहाय्याने मुरुम काढत कामगारांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. रात्रीच्या वेळी काम करताना कामगारांच्या सुरक्षेची तयारी केली होती का? याबाबत तपास सुरु आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा