मुंबई, दि. १२ मे २०२०: लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून राज्यात कलम १८८ नुसार १,३,३४५ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या दाखल झालेल्या गुन्ह्या पैकी १९,६३० व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तसेच अवैध वाहतूक करणाऱ्या १,२९१ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ५५,७८४ वाहने जप्त करण्यात आली आहेत.
परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनाच्या १५ गुन्ह्यांची नोंद प्रशासनाकडून करण्यात आली आहे. आतापर्यंत नोंदवण्यात आलेल्या विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ८७ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पोलिसांवर हल्ल्याच्या २०७ घटना समोर आल्या आहेत. यातील ७४७ आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे. १०० वर आलेल्या ८८,६२३ कॉल्सची योग्य दखल घेण्यात आली आहे.
राज्यात एकूण २,५८,७९२ व्यक्ती क्वारंटाईन:
राज्यातील क्वारंटाईन व्यक्तींची एकूण संख्या २,५८,७९२ इतकी आहे. त्यातील क्वारंटाईन शिक्का असलेल्या ६६२ व्यक्तींना शोधून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आली आहे. राज्यात ४०५० हजार रिलिफ कॅम्प आहेत ज्यामध्ये जवळपास ३,९५,५८८ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
९१ पोलीस अधिकारी, ७९६ पोलीस कर्मचारी संसर्गित:
कोरोनाविषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस देखील २४ तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या ९१ पोलीस अधिकारी, ७९६ पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. मुंबई ४, पुणे १, सोलापूर शहर १, नाशिक ग्रामीण १ अशा ७ पोलीस वीरांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी