गोल पोस्ट शैक्षणीक शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धेवेळी थेट विद्यार्थ्याच्या मानेत घुसला भाला

शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धेवेळी थेट विद्यार्थ्याच्या मानेत घुसला भाला

ओडिशा, १८ डिसेंबर २०२२ : शाळेतील वार्षिक क्रीडा स्पर्धेवेळी विद्यार्थ्याच्या मानेत थेट भाला घुसल्याचा धक्कादायक प्रकार ओडिशा राज्यातील बालंगीर जिल्ह्यात घडला. या दुर्घटनेत विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. सदानंद मेहेर असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याविषयी सविस्तर माहिती अशी, की सदानंद मेहेर हा इत्ता नववीत शिकत असून, बालंगीर येथील आगलपूर बॉय पंचायत हायस्कूलच्या मैदानावर क्रीडाप्रकार सुरू होते. दरम्यान, दुसऱ्या एका विद्यार्थ्याने फेकलेला भाला हा जमिनीवर बसलेल्या सदानंदाच्या मानेत घुसला. त्याच्यावर बलांगीर येथील भीमा भोई वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या घटनेतील विद्यार्थी सदानंदवर चांगले उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. आणि त्याच्या उपचाराचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून केला जाईल, अशी घोषणा केली आहे. विद्यार्थ्याच्या कुटुंबालाही आर्थिक मदत करण्याचे आदेश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version