भरसभेत तेजस्वी यादव यांच्यावर बरसल्या चपला, एक हुकली तर दुसरी हातावर बसली

औरंगाबाद, २१ ऑक्टोबर २०२०: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष आणि त्यांचे दिग्गज नेते अनेक शहरांमध्ये रॅली आणि जाहीर प्रचारसभा घेत आहेत. याच निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मंगळवारी औरंगाबाद येथे सभा घेतली. रॅली दरम्यान गर्दीत उपस्थितांपैकी एका व्यक्तीने तेजस्वी यादव यांच्यावर चप्पल फेकली. हा व्हिडीओ सोशल मीडियात चर्चेत आहे.

यादव हे व्यासपीठावर बसले होते आणि आपल्या कार्यकर्त्यांशी ते बोलत होते. याच वेळी त्यांच्यावर चप्पल फेकण्यात आली. तेजस्वी यादव यांच्यावर एक ते दोन वेळा चप्पल फेकली गेली. पहिल्या वेळेस चप्पल त्यांच्या शरीराला स्पर्श करुन गेली. तात्काळ दुसऱ्यांदा फेकलेली चप्पल तेजस्वी यांच्या हाताला लागली. या घटनेनंतर एकच खळबळ माजली. या घटनेवर आरजेडीच्या कोणत्याच नेत्याने कसलेही विधान केले नाही.

प्रचारसभेसाठी तेजस्वी यादव हे व्यासपीठावर येऊन बसले. यानंतर ते पक्ष कार्यकर्त्यांना काही सूचना देत होते. यादरम्यान त्यांच्यावर चप्पल भिरकण्यात आली. यावेळी तेजस्वी यादव यांचे लक्ष दुसरीकडे होते आणि ते बचावले. चप्पल त्यांच्या बाजूने जाऊन मागे पडली.पण त्या व्यक्तीने आणखी एक चप्पल त्यांच्या दिशेने भिरकावली. ही चप्पल तेजस्वी यादव यांच्या अंगावर येऊन पडली. या घटनेनंतर चप्पल फेकणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला व ती व्यक्ती दिव्यांग असल्याचे लक्षात आल्यानंतर त्या दिव्यांग तरुणाला समजावून शांत करण्यात आलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा