दसरा मेळावा … बाप चोरणारा मुख्यमंत्री .. उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

मुंबई, ५ ॲाक्टोबर : दसरा मेळावा ही शिवसेनेचा परंपरा. या परंपरेनुसार शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर पार पडला. या गेल्या अनेक वर्षांची परंपरा जपताना उद्धव ठाकरे बोलताना भावूक झाले. मुद्दे आहेत पण शब्द नाही, असे सांगताना उद्धव ठाकरे सगळ्यांसमोर नतमस्तक झाले. हे प्रेम आणि आशिर्वाद आणि आई जगदंबेच्या कृपेने मी समोर आहे, असे उद्घव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.

मी कोणालाही भाड्याने आणि बळजबरीने आणले नाही. यंदाचा रावण दहा तोंडाचा नाही तर ५० खोक्याचा असून त्यांनी कट करुन मला उभे राहू न देण्याचा कट केल्याचं उद्घव ठाकरे यांनी सांगितलं.

ज्यांना आमदारकी, खासदारकी सगळं दिलं. ही शिवसेना एकनिष्ठ शिवसैनिकांची असून मी शिवसेना पक्षप्रमुख आहे. हे ठाकरे यांनी सांगितलं.

भाजपने पाठीत सुरा खुपसला. त्यांना धडा शिकवण्यासाठी मी महाविकास आघाडी बरोबर गेलो. अडीच वर्षांचा करार झाला होता, हेच सत्य आहे. हे ठाकरे यांनी पुन्हा पुन्हा नमूद केलं.

देवेंद्र फडणवीसांविषयी बोलताना त्यांनी सांगितलं की, ते मनावर दगड ठेवून उपमुख्यमंत्री झाले.
तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. मी सांगितलं म्हणून शिवसैनिक शांत आहे.
ह्रदयात राम आणि हाताला काम पाहिजे. वाढत्या महागाईवर तुम्ही काय करणार ? अशा अनेक प्रश्नांना त्यांनी समोर आणले.
शिव्या देणं सोपे असते, पण विचार पुढे नेणे हे गरजेचे आहे. ही शिवसेनेची परंपरा मी जपण्याचं काम करत असल्याचं ठाकरे यांनी नमूद केलं.

हिंमत असेल तर काश्मिरचा एक इंच तुकडा जिंकून दाखवा. अमित शाह हे गृहमंत्री आहे की भाजपचे घरचे मंत्री आहे का? हा सवाल त्यांनी केला.

माझं वडिलेपार्जित हिंदुत्व मी जपतो. सर्व प्रकल्प गुजरातमध्ये गेले. आता हिंदूत्व जपण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.
तोतये स्वत:ला बाळासाहेब समजतात. त्यांना शिवसेना पक्षप्रमुख व्हायचं आहे.
भाजपची स्क्रिप्ट न घेता भाषण करुन दाखवा. मी शिवसेनाप्रमुखांचं वचन पूर्ण केलं. असंही उद्घव ठाकरे यांनी सांगितलं.

त्यामुळं आता हिंदुत्व टिकवण्याचं शिवधनुष्य आता आपण उचलले असल्याचं उद्घव ठाकरे यांनी सांगितलं. ही हिंदुत्वाची मदार आता आपण पुढं नेण्यांचं काम करुयात असं सांगत उद्घव ठाकरे यांनी दसरा मेळावा गाजवला.

न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा