दसरा संपला आता पक्षचिन्ह विसरा

मुंबई, ७ ऑक्टोबर २०२२ : दसरा मेळाव्यादरम्यान शिवसेना आणि शिंदे गटाने एकमेकांवर जोरदार तोफा डागल्यात. पण पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षचिन्ह कोणाचं यावर आज निर्णय लागू शकतो अशी माहिती समोर आली होती.

शिंदे गटाने जी कागदपत्र केंद्रीय निवडणूक आयोगात दाखवलीत ती आम्हाला पण द्या मग आम्ही आमच्याकडचे कागदं दाखवतो असे ठाकरे गटाने सांगितले होते, त्यावर आयोगाने शिंदेंना एक प्रत ठाकरे यांच्याकडे देण्यास सांगितली होती. परंतु अजून शिंदेनी काहीही दिले नसल्याचे ठाकरेंनी सांगितले आहे.

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे म्हण मांडण्याची मुदत आज ७ ऑक्टोबरला संपत आहे. त्याआधी शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.एकनाथ शिंदे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला कागदपत्रांच्या प्रतिलीपी द्याव्यात असे आदेश दिले. शिंदे गटाकडून आजपर्यंत कोणतेही कागदपत्र मिळाले नसल्याचा ठाकरे गटाचा दावा आहे. अजूनही दोन्ही बाजूंची कागदपत्रंही आयोगासमोर नाहीत. अंधेरीची पोटनिवडणूकक जाहीर झाली आहे, त्यामुळे अशा स्थितीत आयोगाला काय निर्णय घेतं हे पाहण्याचं ठरणार आहे. शिवसेनेनंही मुदतवाढ मागितली होती. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय घेतो हे पाहण्याचे ठरणार आहे.

एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पत्रात हा दावा केला आहे. तत्काळ सुनावणी घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी निवडणूक आयोगाला केली आहे. उद्धव ठाकरे यांनी कागदपत्र सादर केलेले नाही. त्यामुळे ठाकरे गट जाणून बुजून वेळ काढत असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा