नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुट्टे यांचा राजीनामा, स्थलांतर धोरणाच्या वादावरून आघाडी सरकार कोसळले

नेदरलँड, ८ जुलै २०२३ : स्थलांतर धोरणाबाबत सहमती न झाल्याने नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुट्टे यांनी आघाडी सरकारच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. आज ते राजा विलेम-अलेक्झांडर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन निवडणुका होईपर्यंत सर्व मंत्री काळजीवाहू मंत्रिमंडळ म्हणून काम करत राहतील, असेही त्यांनी सांगितले आहे.

स्थलांतर धोरणावरुन सरकारमधील सहभागी पक्षांमध्ये मतभेद झाल्यानंतर डच सरकार कोसळले. रुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चार मित्र पक्षांमध्ये सहमती होऊ शकली नाही. रुट्टे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार दीड वर्षापूर्वी स्थापन झाले. काही काळापासून स्थलांतर धोरणावरुन सरकारमध्ये सहभागी पक्षांमधील मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले होते.

परिणामी मंत्रिमंडळाच्या तातडीच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना रुट्टे यांनी सरकार कोसळल्याचे सांगितले आहे. रुट्टे यांची व्हीव्हीडी पार्टी गेल्या वर्षी निर्वासितांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करत होती. नेदरलँड्समध्ये निर्वासितांची ४७ हजारांहून अधिक संख्या झाली आहे. या कारणांमुळे सरकार कोसळल्या सांगण्यात आले.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा