मुंबई, २२ जून २०२१: मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन पंधरा दिवसांपूर्वी पोलिसांना आला होता. त्यानंतर मंत्रालयाची कसून तपासणी केली असता, ती अफवा निघाल्याचे स्पष्ट झाले. त्या गोष्टीला काही दिवस होत नाही. तोवर मंत्रालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा ई मेल गृह विभागाला पुण्यातील एका व्यक्तीने केल्याने एकच खळबळ उडाली. यानंतर संपूर्ण मंत्रालायाची तपासणी करण्यात आली आहे. धमकीचा मेल पाठवल्याप्रकरणी शैलेश शिंदे नावाच्या व्यक्तीला पुण्यातील मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मंत्रालयात बाँम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल पुण्यातून आल्याचं स्पष्ट झालं आहे. शैलेश शिंदे नावाच्या व्यक्तीला मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शैलेश शिंदे याच्या मुलाला शाळेत अॅडमिशन मिळाले नाही. या कारणामुळे म्हणून गृहविभागाला धमकीचा मेल केला, असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याचा ई मेल बी. टी. कवडे रोड परिसरात रहाणार्या शैलेंद्र शिंदे या व्यक्तिने केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार संबधित व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर, त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता. शैलेंद्र याने मुलाला शाळेत अॅडमिशन मिळाले नसल्याने, असा प्रकार केल्याचे त्यांनी सांगितले. अशी माहिती मुंढवा पोलिसांनी सांगितली असून या घटनेच्या पार्श्वभूमीवर मरिन ड्राईव्ह पोलिसांनी थोड्याच वेळापूर्वी, आरोपीला ताब्यात घेऊन गेले असल्याचे त्यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे