प्रवासासाठी अजूनही लागणार ई-पास

पुणे, ८ जून २०२१: राज्यात हळूहळू लाॅकडाऊन शिथिल करण्यात येत आहे. या आधी अंतर जिल्हा प्रवासासाठी सरकारने कडक निर्बंध लावले होते. ज्या मध्ये ई-पास हा सक्तीचा करण्यात आला होता. आता राज्यात लाॅकडाऊन जरी शिथिल होत असले तरी प्रवासासाठी ई-पास लागणार असल्याची माहिती सरकारने दिली आहे.
महाराष्ट्रात अॅनलाॅकची प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्यामध्ये जिथे पाॅजिटिव्हिटी रेट कमी आहे तिथे निर्बंध कमी करण्यात येत आहे. लाॅकडाऊन शिथिल करण्याचे पाच टप्पे करण्यात आले आहेत. तर पहिल्या ४ टप्प्यात अंतर जिल्हा प्रवासासाठी ई-पास ची गरज लागणार नाही. पण जर तुमचा जिल्हा ५ व्या लेव्हल मध्ये असेल तर तिथे प्रवासासाठी ई-पास लागणार आहे.
सुदैवाने राज्यातील एक ही जिल्हा पाचव्या टप्प्यात नाहीये. तर पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे. ज्या मुळे लेव्हल ५ मधील जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास काढला लागेल. तरच त्या जिल्ह्यात प्रवास करता येईल अन्यथा तिथे कठोर कारवाई करण्याचे पाऊल प्रशासकीय यंत्रणा करतील.
मात्र ई-पास च्या सक्ती मुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांना याच्या प्रक्रियेचा संताप आल्याचे दिसून येते आहे.ई-पास साठी करावी लागणारी प्रक्रिया हि अतंत्या धिमी असल्याने अनेकांना त्यासाठी बराच वेळ खर्च करावा लागतो.त्यामुळे ई-पास संदर्भात राज्याच्या नागरिकांमध्ये असंतोष हि पहायला मिळाला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा