India Strom into Champions Trophy Final : दुबई येथील आंतराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफाईनलचा सामाना खेळवण्यात आला. हा सामना भारतीय संघाने जिंकून स्पर्धेच्या फाईनलमध्ये धडक घेतली आहे. या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियचा ४ विकेट्सने पराभव केला आहे. प्रथम नाणेफेक जिंकून काँगरू संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी प्रथम फलंदाजी करताना ४९.३ षटकांत २६४ धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाने ४८.१ षटकांत ६ गडी गमावून हे लक्ष्य पूर्ण केले. टीम इंडियाडून विराट कोहली आणि हार्दिक पांड्या हीरो ठरले. विराटने ८४ धावांची तर हार्दिकने २८ धावांची आक्रमक खेळी केली. या विजयासह भारतीय संघाने २०२३ विश्वचषकाच्या परभवाचा बदला घेतला आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव स्मिथने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या संघाची सुरुवात चांगली झाली नव्हती. सलामीवीर कुपर कॉनोली खाते न उघडताच बाद झाला. यानंतर ट्रॅव्हिस हेड याने ३३ चेंडूत ३९ धावांची खेळी केली. ज्यावेळी हेड फलंदाजी करत होता तेव्हा तो आक्रमक लयात होता. पण ८ व्या षटकांत वरुण चक्रवर्तिने फसवा चेंडू टाकून त्याला बाद केले. यानंतर काँगरू संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने सावधगिरीने फलंदाजी केली आणि मार्नस लॅबुशेन सोबत मिळून संघाचा डाव सांभाळला. त्यांनी दोघांनी मिळून ९६ चेंडूत ७३ धावांची भागीदारी केली. यानंतर ॲलेक्स कॅरीने ६१ धावंची शानदार खेळी करत ऑस्ट्रेलिया संघाला २६३ धावसंखेपर्यंत पोहोचवले. टीम इंडियाकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
विराट कोहलीची शानदार कामगिरी :
२६४ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात चांगली झाली नाही. सलामीवीर शूबनम गिल फक्त ८ धावा करून बाद झाला. तर कर्णधार रोहित शर्माला सुद्धा चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने २९ चेंडूत २८ धावा केल्या. यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी शानदर भागीदारी करत टीम इंडियाचा डाव सांभाळला. ज्यावेळी श्रेयस फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला तेव्हा त्याने आक्रमक शॉटस खेकळायला सुरुवात केली. त्याने ६२ चेंडूत ४५ धावांची तर विराट कोहलीने ९८ चेंडूत ५ चौकार ठोकत ८४ धावा केल्या. कालच्या सामन्यात सुद्धा विराट शतक झळकावेल असे सर्व चाहत्यांची अपेक्षा होती. पण तसे झाले नाही ॲडम झाम्पाने त्याला झेलबाद केले. यानंतर के. एल राहुलने ३४ चेंडूत ४२ धावंची नाबाद खेळी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर