अर्जेंटिनाच्या विजयानंतर दिग्गज फुटबॉलपटू पेले यांचा हॉस्पिटलमधून भावनिक संदेश; म्हणाले…

नवी दिल्ली, १९ डिसेंबर २०२२: करायच्या लुसैल स्टेडियममध्ये खेळण्यात आलेल्या फायनलमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सवर पेनल्टी शूटआउट मध्ये ४-२ न विजय प्राप्त केला‌. अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यातील सामना अतिरिक्त वेळेनंतरही ३-३ अशा बरोबरीचा असल्याने पेनल्टी शूटआउटमध्ये सामन्याचा निकाल लावण्यात आला. एकंदरच कालची मॅच अतिशय विलक्षण होती. अर्जेंटिनाच्या विजयानंतर ब्राझीलसाठी तीनवेळा विश्वविजयाचे स्वप्न जगलेले दिग्गज फुटबॉलपटू पेले यांनी लिओनेल मेस्सीला वर्ल्डकप विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CmUqLGguD6_/?igshid=MDM4ZDc5MmU=

ब्राझीलचे महान फुटबॉल खेळाडू पेले सध्या श्वसन संदर्भातील तक्रारीमुळे रुग्णालयात उपचार घेत आहेत. परंतु त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून लिओनेल मेस्सी याला शुभेच्छा देत पोस्ट केली आहे.

  • डिएगो आता नक्कीच हसत असेल

दिग्गज पेले म्हणाले, फुटबॉलने आज पुन्हा एकदा आपली कहाणी रोमांचक पद्धतीने सांगितली आहे. मेस्सीने आपला पहिलावहिला विश्वचषक जिंकला. ज्यावर त्याचा नक्कीच अधिकार होता. माझा प्रिय मित्र एम्बापेने फायनलमध्ये ४ गोल केले. खेळाच्या भविष्यासाठी थरारक सामना रंगणं हे एक रोमांचक गिफ्ट पेक्षा कमी नव्हतं. पुढे ते म्हणाले, अर्जेंटिनाचे अभिनंदन. डिएगो आता नक्कीच हसत असेल तो जिथे कुठे असेल तिथे त्याला नक्कीच आनंद झाला असेल.

फायनल मध्ये मेस्सीने दोन गोल केले. तर फ्रान्सच्या एम्बापेने तीन गोल केले. तर पेले यांनी सेमी फायनलमध्ये दाखल झालेल्या आफ्रिका देश मोरक्कोचे देखील कौतुक केले.

  • नरेंद्र मोदी यांचे ट्विट:

पेलेंप्रमाणेच अनेक दिग्गजांनी मेस्सीला शुभेच्छा दिल्या आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील विजयी झालेल्या अर्जेंटिना संघाचे अभिनंदन करून हा सर्वात थरारक फुटबॉल सामना म्हणून लक्षात राहील असे म्हणत ट्विट केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा