उत्तरकाशी, १९ डिसेंबर २०२२ :उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ३.१ रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने सांगितले की, सोमवारी पहाटे १ वाजून ५० मिनिटांनी उत्तरकाशी पासून २४ किलोमीटर दूर पूर्व दक्षिण पूर्वेला हा भूकंप झाला, ज्याची खोली जमिनीच्या खाली ५ किमी होती. यापूर्वी उत्तराखंडच्या टिहरीमध्ये ६ नोव्हेंबर रोजी भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टल स्केल एवढी होती.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.