छत्तीसगढ मधील अंबिकापूरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के!

7

छत्तीसगढ, १४ ऑक्टोंबर २०२२: छत्तीसगढमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. छत्तीसगढमधील अंबिकापूरमध्ये सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. शुक्रवारी (१४ ऑक्टोबर) सकाळी ५ वाजता २८ मिनिटांनी हा भूकंप झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबिकापूरपासून ६५ किलोमीटर दूर झालेल्या या भूकंपाची तीव्रता ४.८ रिश्टल स्केल एवढी होती. भूकंपाचे केंद्र जमिनीपासून १० किलोमीटर खाली होते. मात्र, या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. लोकांना भूकंपाची जाणीव होताच लोक घरातून बाहेर पडले. कोरिया जिल्ह्यातील आजूबाजूच्या परिसरात देखील या भूकंपाचे धक्के जाणवले.

यापूर्वी देखील जुलै महिन्यात छत्तीसगढमधील सोनहतमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाची तीव्रता ४.७ रिश्टल स्केल एवढी होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा