गोल पोस्ट राष्ट्रीय दिल्लीनंतर मेघालयमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के !

दिल्लीनंतर मेघालयमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के !

मेघालय, २ जानेवारी २०२३ :नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीनंतर मेघालयमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने सांगितले की, रविवारी रात्री ११ वाजून २८ मिनिटांनी मेघालय पासून ६० किलोमीटर दूर नोंगपोहला हा भूकंप झाला, ज्याची खोली जमिनीच्या खाली १० किमी होती. यापूर्वी दिल्लीत रविवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाची तीव्रता ३.८ रिश्टल स्केल एवढी होती.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version