गोल पोस्ट राष्ट्रीय गुजरातच्या सुरतमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के !

गुजरातच्या सुरतमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के !

अहमदाबाद, २० ऑक्टोबर २०२२: गुजरात मधील सुरतमध्ये आज भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी (२० ऑक्टोबर) सकाळी १० वाजता २६ मिनिटांनी हा भूकंप झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरतपासून ६१ किलोमीटर दूर दक्षिण पूर्वेस झालेल्या या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टल स्केल एवढी होती. भूकंपाचे केंद्र जमिनीपासून ७ किलोमीटर खाली होते. मात्र, या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. लोकांना भूकंपाची जाणीव होताच लोक घरातून बाहेर पडले.

सप्टेंबरमध्ये भारतात ३५ वेळा जाणवले भूकंपाचे धक्के !

१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान भारतात ३५ भूकंप झाले. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे ७ वेळा, लडाखमध्ये ४ वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. महाराष्ट्रातील भूकंपाची तीव्रता १.७ ते २.६ इतकी होती. अरुणाचल प्रदेशात २, आसाममध्ये ३, गुजरातमध्ये २, हिमाचलमध्ये २, जम्मू-काश्मीरमध्ये ३, मणिपूरमध्ये ३, मेघालयात १, पंजाबमध्ये १, राजस्थानमध्ये १, उत्तराखंडमध्ये १ आणि अंदमानला ३ वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक

error: Content is protected !!
Exit mobile version