उत्तराखंड, २० फेब्रुवरी २०२१: उत्तराखंड मध्ये नुकताच हिमनग तुटल्याने अनेक लोकांनी आपला जीव गमावला होता. यातून तेथील जनता अजून सावरली देखील नसेल तोच उत्तराखंडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहे. उत्तराखंड मधील पिथौरागड मध्ये काल सायंकाळी ४ वाजून ३८ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. रिक्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ४ मोजली गेली. परंतु कोणत्याही प्रकारची हानी नोंदवली गेली नाही ही एक दिलासादायक बाब आहे.
कोणतेही नुकसान नाही
उत्तराखंडच्या चमोली येथे नुकत्याच कोसळलेल्या हिमनगामुळे मोठे नुकसान झाले होते. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. त्यातच आता येथे आणखी एक भूकंप झाला आहे. मात्र, अद्याप कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. पिथौरागड येथे सायंकाळी ४.३८ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. रिक्टर स्केलवर त्याची तीव्रता 4 होती.
त्याचबरोबर शनिवारी बिहारची राजधानी पटना येथेही भूकंपाचे सौम्य झटके जाणवले आहेत. हे भूकंप ९.२३ मिनिटांवर जाणवले आहेत. हादरे जाणवताच लोक घराबाहेर पडले. रिक्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ३.५ मोजली गेली. भूकंपाचे केंद्रबिंदू जमिनीपासून ५ किलोमीटर खाली होते. भूकंपाचे केंद्र नालंदाच्या वायव्येस २० किलोमीटर अंतरावर होते. १२ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजताही उत्तर भारतातील अनेक राज्यांत भूकंपाचे धक्के जाणवले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे