भूकंपाने हादरले इंडोनेशिया

जकार्ता, १६ जानेवारी २०२३ : इंडोनेशियामधील उत्तरी सुमात्रा भागात सोमवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ६.१ रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने सांगितले की, इंडोनेशियातील सिंगकिल शहरापासून ४८ किलोमीटर आग्नेय दिशेला आज पहाटे ३ वाजून ५९ मिनिटांनी हा भूकंप झाला. यापूर्वी १० जानेवारी रोजी देखील इंडोनेशियामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाची तीव्रता ७.७ रिश्टल स्केल एवढी होती.

दरम्यान, यूरोपियन मेडिटेरेनियन सीस्मोलॉजिकल सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, आता काही तासात किंवा काही दिवसांमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रीय अधिकार्‍यांनी दिलेल्या सूचनांचे सर्वानी पालन करावे आणि सुरक्षित राहावे.

  • महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्येही भूकंप

महाराष्ट्रातील चंद्रपूर शहरातील बाबूपेठ, लालपेठ आणि नांदगाव परिसरातही भूकंप सदृश्य धक्के जाणवले. काल रात्री अंदाजे ९.३० च्या सुमारास भूकंप झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा