भूकंपाने इराण हादरले; ७ जणांचा मृत्यू, ४४० जखमी

4

तेहरान , २९ जानेवारी २०२३ :तुर्की-इराण सीमेजवळील उत्तर पश्चिम अजरबैजान प्रांतातील खोय शहरात शनिवारी रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.

मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.९ इतकी मोजली गेली आहे. आणि त्याचा केंद्रबिंदू १० किमी खोलीवर होता. टीआरटी वर्ल्डने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपामध्ये सात जणांचा मृत्यू झाला. तर ४४० जण जखमी झाले आहेत. भूकंपाचे धक्के खोय शहराच्या आसपासच्या परिसरात देखील जाणवले असून इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून, भूकंपग्रस्त भागात बचाव पथके पाठवण्यात आली आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. तर रुग्णालयांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा