गुजरात, दि. १५ जून २०२०: गुजरातमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. दुपारी १२.५७ वाजता कच्छ येथे भूकंपाचा धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर हा भूकंप ४.५ होता. भूकंपाचे केंद्रस्थळ कच्छपासून १५ किलोमीटर अंतरावर होते. भूकंपानंतर लोक घराबाहेर पडले. यापूर्वी रविवारी कच्छ येथे ५.५ तीव्रतेचा भूकंप झाला होता.
आजच्या भूकंपाचे केंद्र भूजच्या भाचाळ जवळ होते. काल रात्री झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू भचाऊ जवळ होते. काल रात्रीपासून आतापर्यंत छोट्या-मोठ्या भूकंपांचे ११ वेळा धक्के बसल्याचे सांगितले जात आहे. लोक घाबरले आहेत. सध्या कोणतीही जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
जम्मू-काश्मीरमध्येही भूकंप
जम्मू-काश्मीरमध्ये आठवड्यातून दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले. सोमवारी पहाटे ४.३६ वाजता भूकंपाचा हादरा जाणवल्याचे सांगितले जात आहे. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.२ होती. यात कोणतेही जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
रविवारी रात्री उशिरा गुजरातमध्ये भूकंप
रविवारी रात्री ७.१३ वाजता गुजरातमध्ये भूकंप झाला, त्यानंतर भीतीचे वातावरण होते भूकंप होताच लोकांनी घरातून बाहेर धाव घेतली. भूकंपाचे केंद्रबिंदू कच्छमधील भाचाळच्या आत दहा किमी अंतरावर आहे. या भूकंपानंतर कच्छ मधील बर्याच घरांना तडे गेले आहेत
न्यूज अनकट प्रतिनिधी