हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; ३.६ रिश्‍टर स्केलची नोंद

पुणे, ८ जानेवारी २०२३ : हिंगोली जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास गावकरी साखरझोपेत असताना अनेक ठिकाणी जमिनीतून आवाज अन् भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे नागरिक घराबाहेर पडले. जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील जिल्ह्यातील औंढा नागनाथ, वसमत, कळमनुरी या तीन तालुक्यांतील गावांत आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास भूकंप झाल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनं दिली आहे. त्यची तीव्रता ३.६६ रिश्टर स्केल एवढी होती. या भूकंपात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही.

हिंगोलीच्या वसमत, कळमनुरी आणि औंढा नागनाथ तालुक्यांमध्ये यापूर्वीही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. पुन्हा आज सकाळी ४ वाजून ३० मिनिटाला गावकरी ऐन साखरझोपेत असताना ३.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने ही माहिती दिली; परंतु या प्रकारानंतर वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ या तिन्ही तालुक्यांतील नागरिक भयभीत झाले आहेत. औंढा नागनाथ तालुक्यातील दुधाळा, जलालधाबा, राजापूर या गावांत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यात कोणतेही नुकसान झाले नसून प्रशासनाकडून घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आले असून, कुठल्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा