जेजुरी, २३ फेब्रुवारी २०२४ : खंडोबा नगरीत माही पौर्णिमा यात्रेच्या कुलाबाकर पालखी सोहळ्यात महाराष्ट्र विधानभवन अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि पुरंदर तालुका आमदार संजय जगताप यांनी उपस्थिती दर्शवत कुलाबकरांच्या जेजुरी चिंच बागेतील कुलदैवत खंडोबा पालखी सोहळ्यातील कुलब्यात उभारण्यात येणाऱ्या नियोजित भव्य आशा राममंदिर प्रतिकृतीचे उदघाट्न केले. यावेळी कुलाबाकर कोळी बांधवांच्या वतीने पारंपरिक कोळी परंपरेची टोपी ही नार्वेकर आणि जगताप यांना परिधान करण्यात आली. यावेळी कुलाबाकर बांधवांच्या वतीने या आनंद सोहळ्यात विविध देवीदेवतां, महापुरुषांची आणि आधुनिक पारंपरीक वेशभूषा करण्यात आली होती.
खंडोबा नगरी जेजुरी हे कोळी बांधवांचे श्रद्धा आणि भक्तीचे ठिकाण असून शेकडो वर्षांपासून कुलाबाकर कोळी समाज जेजुरी माघ पौर्णिमा यात्रेला येत असतो. म्हणूनच समस्त कुलाबाकरांच्या भक्ती करिता कुलब्यात भव्य असे खंडोबा मंदिर उभारणार असल्याचे नार्वेकर यांनी जाहीर केले असून जेजुरीत त्यांना यात्रेला दरवर्षी येण्याकरिता सुसज्ज निवास व्यवस्थाही चिंचबन परिसरात करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पालखी सोहळ्यातील आनंद मेळाव्यात नार्वेकर यांनी आनंद घेत त्यांच्या बरोबर नृत्यचाही आनंद लुटला. या प्रसंगी पालखी जेजुरी मार्तंड देवस्थान अध्यक्ष अनिल सौन्दडे, ट्रस्टी अभिजित देवकाते, मंगेश घोणे, पांडुरंग थोरवे, भाजपचे सचिन पेशवे, जेजुरी नगरसेवक सचिन सोनवणे, भाजपा कोल्हापूर प्रभारी अलका शिंदे, शिवसेना भाजपा आणि संघ कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते. यंदाच्या यात्रेत मात्र कोळी बांधवांची संख्या जरी अल्पशा असली तरी मात्र यात्रेतील उत्साह आणि जोश कायम होता.
न्युज अनकट प्रतिनीधी : विजयकुमार हरिश्चंद्रे