ED ने PMC बँकेची 3830 कोटींची मालमत्ता केली जप्त

ईडीने आपल्या कारवाईचं जाळ घट्ट करत पीएमसी बँकेच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.
कोटींची मालमत्ता जप्त
 पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या (पीएमसी) घोटाळ्या प्रकरणी ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) पीएमसी बँक अधिकारी, एचडीआयएलचे संचालक आणि प्रमोटर्स यांची 3830 कोटींपेक्षा अधिक स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त केली आहे.
  अधिकाऱ्यांवर कारवाई : पीएमबी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी एचडीआईएलचे प्रवर्तक राकेश आणि सारंग वाधवा यांना 3 ऑक्टोबरला अटक करण्यात आली आहे.
 पीएमसी बँकेचे माजी अध्यक्ष वरियम सिंह यांच्या खात्यात ईडीला दहा कोटी रुपये सापडले आहेत, त्यालाही अटक करण्यात आलेली आहे.
 आतापर्यंत शेकडो कोटीच्या संपत्तीचा उलगडा झाला आहे. ईडी लंडन आणि दुबईमधील मालमत्तांचाही शोध घेत आहे. तेथील मालमत्तांचा वाधवा यांच्याशी काही संबंध आहे का याची पडताळणी करण्यात येत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा