दिल्ली, १० जून २०२३: ईडीने शाओमी इंडिया या मोबाईल निर्माता कंपणीच्या दोन अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली आहे. ईडीकडून कंपणीच्या दोन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ईडीने नोटीसद्वारे ५,५५१ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा हिशोब मागितला आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या उल्लंघनाबाबत ही नोटीस बजावण्यात आली आहे.
कंपणीचे मुख्य आर्थिक अधिकारी आणि संचालक समीर बी राव, माजी व्यवस्थापकीय संचालक मनु कुमार जैन यांना या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. या शिवाय ईडीने तीन विदेशी बँकांना देखील नोटीस पाठवली आहे. यामध्ये सिटी बँक, एचएसबीसी बँक आणि ड्युश बँक एजीचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर कारणे दाखवा नोटिस जारी केली जाते.
शाओमी इंडियाला नोटीस पाठविल्याबाबत ईडीने यांची अधिकृत माहिती दिली. ईडीने सांगितले की, शाओमी इंडियांने २०१५ पासून त्यांच्या मूळ चायनीज कंपणीला पैसे पाठवत होते. या प्रकरणाच्या तपासात असे आढळून आले की शाओमी इंडियाने २०१४ पासून भारतात काम सुरू केल्याच्या एक वर्षांनंतरच हे पैसे पाठवण्यास सुरुवात केली.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर