राजस्थान, दि. २२ जुलै २०२०: आज बुधवारी सकाळी राजस्थान मध्ये इडी कडून वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. यामध्ये अशोक गेहलोत यांचे बंधू अग्रसेन गेहलोत यांच्या मालकीच्या कंपनीवर देखील छापा टाकण्यात आला. एकीकडे राजस्थानमध्ये सत्तासंघर्ष चालू आहे तर दुसर्या बाजूला इडी कडून असे छापे घालण्याचे काम सुरू आहे. संबंधित कारवाईही कथित खत घोटाळ्याप्रकरणी करण्यात आली आहे. हे छापे अग्रसेन गेहलोत यांची मालकी असलेल्या सर्व ठिकाणी घालण्यात आले आहे.
ईडी राजस्थानमधील जोधपूर सहीत इतर सहा ठिकाणी, पश्चिम बंगालमधील दोन ठिकाणी, गुजरातमध्ये चार ठिकाणी आणि दिल्लीत एक ठिकाणी छापे टाकत आहे. अग्रसेन गहलोत यांची कंपनी अनुपम कृषी वर मलेशिया आणि व्हिएतनामला शेतकर्यांना सवलतीच्या दरात खरेदी केलेले खत जास्त दराने विकल्याचा आरोप आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार हा १५० कोटींचा घोटाळा आहे.
नुकतेच खत घोटाळ्यात मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे भाऊ अग्रसेन गहलोत यांचे नाव समोर आले होते. असा आरोप आहे की २००७ ते २००९ दरम्यान अग्रसेन गहलोत यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेले खत खासगी कंपन्यांना दिले. यावेळी केंद्रात मनमोहनसिंग यांचे सरकार होते आणि अशोक गहलोत हे मुख्यमंत्री होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी