ऑनलाइन बेटिंग-जुगाराशी संबंधित प्रकरणात ५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त, ईडीची मोठी कारवाई

नवी दिल्ली, २७ ऑगस्ट २०२३ : बेकायदेशीर ऑनलाइन सट्टेबाजी आणि जुगार अॅप्स चालविल्याचा आरोप असलेल्या व्यक्ती आणि कंपन्यांच्या मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीचा भाग म्हणून, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता जप्त केली आहे. बेंगळुरू पोलिसांच्या एफआयआरमधून हि कारवाई सुरु झालेली, जीच्या बाबतीत सुरुवातीला वस्तू आणि सेवा कर गुप्तचर महासंचालनालयाने (DGGI) ऑनलाइन जुगार, सट्टेबाजी आणि संशयित बेकायदेशीर क्रियाकलापांमध्ये कंपन्यांचा सहभाग असल्याचा आरोप नोंदवला होता.

केंद्रीय तपास यंत्रणेच्या तपासात असे आढळून आले की,आरोपी श्यामला एन आणि उमर फारूक यांनी इतर व्यक्तींच्या कागदपत्रांचा वापर करून अनेक कंपन्या नोंदणी केल्या होत्या. कंपन्यांच्या एचआर व्यवस्थापकांनी बेकायदेशीरपणे अनेक सिम कार्डे खरेदी केली आणि ऑनलाइन व्यवहारांसाठी ते बँक खात्यांशी जोडले. सट्टा आणि जुगाराच्या नावाखाली जनतेची फसवणूक करून पैसे गोळा करण्याच्या उद्देशाने ऑक्युलस व्हॉल्व्ह एंटरटेनमेंट आणि नेस्ट्रा वेब सोल्युशन्स या कंपन्यांची स्थापना करण्यात आली होती.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) एका निवेदनात म्हटले आहे की, मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा (पीएमएलए) अंतर्गत जारी केलेल्या तात्पुरत्या आदेशानुसार जप्त केलेल्या बँक ठेवींचे एकूण मूल्य ५.८७ कोटी रुपये आहे. कथित फसवणूक करणारे अॅप्स बी स्टार-टेक, खेलो २४ बेट आणि बेट इन एक्सचेंज म्हणून ओळखले जातात.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा