छत्तीसगडमध्ये ईडीने छाप्यातून जप्त केले ४ कोटी रुपये

छत्तीसगड, १२ ऑक्टोबर २०२२: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी छत्तीसगडमधील काही वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिकांच्या घरांवर छापे टाकून ४ कोटी रुपयांची रोकड जप्त केली.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ईडीने काल सकाळी रायपूर, रायगड, महासमुंद, कोरबा आणि इतर जिल्ह्यांमध्ये छापे टाकण्यास सुरुवात केली होती. ईडीने ज्यांच्या जागेवर छापे टाकले आहेत त्यात जिल्हाधिकारी आणि सरकारच्या जवळचे काही वरिष्ठ अधिकारी, व्यापारी आणि काँग्रेस नेते यांचा समावेश आहे. ईडीच्या छाप्यात मोठ्या प्रमाणात रोकड आणि सोने जप्त करण्यात आले आहे.

भाजपला लढता येत नाही, म्हणून केंद्रीय एजन्सीचा गैरवापर

दरम्यान, हा एकप्रकारे धमकावण्याचा प्रयत्न आहे आणि निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसे यामध्ये वाढ होईल, अशी प्रतिक्रिया छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिली आहे.उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी सैफईला रवाना होण्यापूर्वी बघेल यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले, भारतीय जनता पक्ष थेट लढू शकत नाही, त्यामुळे ईडी, आयटी, डीआरआयच्या माध्यमातून लढण्याचा प्रयत्न करीत आहेत. जसजशी निवडणूक जवळ येईल तसतसे हे प्रकार अधिक वाढवतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा