कोलकाता मध्ये ED ची मोठी कारवाई, आमिर खानच्या घरातून १७ कोटी जप्त

कोलकाता, ११ सप्टेंबर २०२२: कोलकाता मध्ये ईडी ची मोठी कारवाई व्यवसायिक आमिर खान यांच्या घरातून अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने १७ कोटी रुपयाची रोकड जप्त केली आहे. ही रक्कम पाच बॅगमध्ये ठेवण्यात आली होती. अंमलबजावणी संचालयाने व्यवसायिक आमिर खान यांच्या गार्डन रिच येथील निवासस्थानी छापेमारी केली.

गार्डन रिच येथील निवासस्थानी शनिवारी सकाळी छापेमारी करण्यात आली. तर छापेमारीत रात्री उशिरापर्यंत पैशाची मोजणी चालू होती. कोलकाता येथील व्यवसायिक आमिर खानच्या निवासस्थानी ईडीला दहा बॅग सापडल्या होत्या. या दहा बॅग पैकी ५ बॅग मध्ये ५००, २००० आणि २००, रुपयाच्या नोटा भरून ठेवण्यात आल्या होत्या. ED ने आर्थिक गैरव्यवर कायदा २००२ (PMLA) अंतर्गत कारवाई केली आहे. मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे.

Ed च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार व्यवसायिक आमिर खानने गेम चा वापर करून लोकांची फसवणूक केली आहे. आमिर खान ने ई – नगेट्स ॲप लॉन्च करून युजर्सच्या वॉलेटमध्ये पैसे पाठवले. त्यानंतर युजर्सचा अ‍ॅपवरील विश्वास वाढल्याने युजर्स अ‍ॅपमध्ये अधिक पैसे गुंतवू लागले. त्यानंतर युजर्स प्रोफाइलमधील माहितीसह सर्व हटवली गेली त्या नंतर या ॲप चा वापर करत युजर्सची आमिरने फसवणूक केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा