पुणे, १७ नोव्हेंबर २०२० : समाजात उत्तम कार्य करण्यासाठी विद्यादान महत्त्वाचं आहे, त्यासाठी समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत शिक्षण पोचायला हवं असं मत केंद्रीय रस्ते आणि वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. ते आज पुण्यात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हिरक महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेत बोलत होते.
भारताकडे शिक्षण क्षेत्रात पुढे जाण्याची पूर्ण क्षमता आहे, देशानं तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली आहे, त्याचा वापर होणं गरजेचं आहे असंही त्यांनी नमूद केलं. फुले शाहू आंबेडकर यांनी केलेल्या क्रांतीनं समाजजीवन आमूलाग्र बदललं, या तीघांनीही दाखवलेले मार्ग अवलंबून समाजातला जातीभेद दूर करायसाठी प्रयत्न व्हायला हवेत असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी