उद्या सकाळपासून पृथ्वीच्या कक्षे शेजारून जाणारा आठ एस्टेरॉयड

वॉशिंग्टन, दि. ४ जून २०२०: उद्या सकाळपासून म्हणजेच ५ जूनच्या सकाळपासून पृथ्वीच्या कक्षे जवळून अनेक लघुग्रह जाणार आहेत. यातील काही उपग्रह लहान आहेत तर काही स्टेडियमच्या आकाराचे सुद्धा आहेत. अमेरिकेची खगोल संशोधन संस्था नासा’ने या विषयी माहिती देत सांगितले आहे की, ८ नियर अर्थ ऑब्जेक्ट ५ जून पासून ते आठवडा संपेपर्यंत पृथ्वीच्या कक्षे जवळून जाणार आहेत.

नासाच्या सेंटर फॉर नियर अर्थ ऑब्जेक्ट्स स्टडीजने (सीएनईओएस) अहवाल दिला आहे की ५ जून रोजी सकाळी ४.४४ वाजता एस्टेरॉयड २०२० केएन ५ पृथ्वीजवळून जाईल. त्याचा व्यास २४ ते ५४ मीटर दरम्यान आहे. हे प्रति सेकंद १२.६६ किलोमीटर वेगाने म्हणजेच ४५,५७६ किलोमीटर प्रति तास वेगाने जाईल. हे पृथ्वीच्या कक्षेपासून सुमारे ६१ लाख किलोमीटर अंतरावरून जाईल.

५ जून रोजी संध्याकाळी ५.४१ वाजता एस्टेरॉयड २०२० के ६ पृथ्वीपासून ४४.१३ लाख किलोमीटर अंतरावरुन जाईल. त्याचा व्यास सुमारे २८ मीटर आहे. हे पृथ्वीच्या दिशेने प्रति तास ४१,६५२ किलोमीटर वेगाने जाईल.

यानंतर, ६ जून रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ८.५० च्या सुमारास एस्टेरॉयड २०२० एनएन ४ पृथ्वीवरून जाईल. पृथ्वीपासून त्याचे अंतर सुमारे ५१ लाख किलोमीटर असेल. हे पृथ्वीवरून ताशी ४०,१४० किमी वेगाने निघेल. या लघुग्रहाचा व्यास ५७० मीटर आहे. म्हणजे पाच फुटबॉल मैदानाच्या समतुल्य.

६ जून रोजी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास एस्टेरॉयड २०२० केओ १ नावाचा एक लघुग्रह पृथ्वीच्या कक्षा जवळून जाणार आहे. हे पृथ्वीपासून ५०.९३ लाख किलोमीटर अंतरावरून जाईल. त्याचा वेग ताशी २१,९३० किमी असेल. त्याचा आकार फार मोठा नाही. त्याचा व्यास २६ मीटर ते ५९ मीटर पर्यंत असू शकतो.

६ जून रोजी रात्री ११.०८ वाजता एस्टेरॉयड २०२० केक्यू १ जाईल. त्याचा व्यास ३६ ते ८१ मीटर दरम्यान असेल. हे पृथ्वीपासून ५१.५३ लाख किलोमीटर अंतरावर जाणार आहे. त्याचा ताशी ५६,७४८ किमी वेग असेल.

एस्टेरॉयड २०२० एलए ६ जून रोजी रात्री १.३० वाजता पृथ्वीपासून सुमारे १४.३१ लाख किलोमीटर अंतरावरुन जाईल. त्याचा व्यास २४ ते ५३ मीटर दरम्यान आहे. त्याचा वेग ताशी ५५,५७४ किलोमीटर आहे.

यानंतर ७ जून रोजी दुपारी १२.०३ वाजता एस्टेरॉयड २०२० के ७ पृथ्वीच्या बाजूने जाईल. हा पृथ्वीपासून सुमारे १४.६७ लाख किलोमीटर अंतरावर असेल. त्याचा व्यास २३ ते ५१ मीटर दरम्यान असेल. त्याचा वेग ताशी २६,४२४ किलोमीटर आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा