कशेडी घाटात टँकरची एसटी बसला धडक, आठ प्रवाशी जखमी

पोलादपूर, चीपळून ७ ऑगस्ट २०२३ : गोवा महामार्गावरील कशेडी घाटात टँकर आणि एसटी बसच्या झालेल्या अपघातात ८ जण जखमी झाले आहेत. ही घटना आज दुपारी १२ च्या सुमारास घडली. या बाबत अधिक माहिती अशी की, कशेडी घाटात कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्रापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर, ठाणे-चिपळूण एसटी बसला टँकरने समोरुन धडक दिली. या अपघातात एसटी बसमधील ८ प्रवाशी जखमी झाले आहेत.

या बसमध्ये एकूण तीस प्रवाशी होते. जखमींमध्ये दोनजण गंभीर जखमी झाल्याने त्यांना कळंबनी उपजिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक फौजदार यशवंत बोडकर यांनी दिली आहे.

या अपघाताची माहिती मिळताच कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक फौजदार बोडकर, साखरकर, चिकणे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलिसांनी दोन्ही वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा