मालेगावमधील आठ पोलिसांना कोरोनाची लागण

4

नाशिक, दि.२९एप्रिल २०२०: नाशिकच्या मालेगावमधून धक्कादायक बातमीसमोर आली आहे. मालेगाव मधील ८४ संशयित रुग्णांचे अहवाल प्रशासनाला मिळाले आहेत. त्यापैकी ७३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर ११ जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

आज ( बुधवारी) सायंकाळी मिळालेल्या अहवालात ११ कोरोना बाधित रुग्णांमध्ये ७ पोलीस तर १ सीआरपीएफ जवान असे एकूण ८ सुरक्षा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

मालेगावमध्ये आतापर्यंत एकूण १२ पोलिस कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी दुपारीच मालेगावचा आढावा घेतला. सोबतच आरोग्यमंत्री राजेश टोपे सुद्धा होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही महत्वाचे मंत्री आज नाशिक दौऱ्यावर असतांना पोलिसांनाच कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट करण्यात आल्याने गृहमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना धक्का बसला आहे.

नाशिक जिल्ह्यात मालेगावमध्ये नव्याने ११ रुग्ण कोरोना बाधित आढळल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या२०४ झाली आहे. त्यामुळे नाशिककरांची चिंता चांगलीच वाढली आहे. एकट्या माळेगावमध्ये १८२ रुग्ण बाधित असून ११ शहर, तर ११ जण इतर ग्रामीण भागातील आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे.तर ९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे मालेगाव आता कोरोनाचे हॉटस्पॉट होणार अशी चिन्हे आता दिसू लागली आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा