एक आठवण कपिल देवच्या १८ जून १९८३ च्या १७५ धावांची

सर्वात मोठी एकदिवसीय खेळी ज्याचा कधीही प्रसारण झाला नाही

१८ जून १९८३ च्या क्रिकेट विश्वचषक गटातील साखळी सामना.रॉयल टेंनब्रिज वेल्सच्या नेव्हिल मैदानावर भारत विरुद्ध झिम्बाब्वेमध्ये खेळला गेला.
२४ वर्षीय कपिल देव जेव्हा खेळपट्टीवर आला तेव्हा भारत नऊ धावांवर चार गडी बाद झाला होता.

सुनील गावस्कर म्हणतात की, “एक खेळाडू आणि एक समालोचक म्हणून मी यापूर्वी कधीही इतका चांगला डाव (कपिलच्या १७५ धावा ) कधीही पाहिला नव्हता. हा खरा कर्णधाराचा डाव होता, जे पुरेसे मजेदार होता व प्रेक्षणीय होता

याबाबत बोलताना सुनिल गावस्कर सांगतात की कपिलची ही खेळी त्यावेळेस प्रसारित केली गेले नाही कारण वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात सगळे कॅमेरे होते आणि या सामन्याचे कोणतेही रेडिओ समालोचन नव्हते कारण बीबीसीतील कर्मचारी त्यावेळेस संपावर होते. त्यामुळे कपिलच्या या खेळीचे कसलेच रेकॉर्ड आपल्याकडे उपलब्ध नाही हे एक आपले दुर्दैवच म्हणावे लागेल.

सुनील गावस्कर, क्रिश श्रीकांत, मोहिंदर अमरनाथ आणि संदीप पाटील यांना वेगवान गोलंदाज पीटर रॅव्हसन व केविन कुरन यांच्या जोडीने १० धावांच्या आधीच पैविलियन मध्ये माघारी पाठवले होते. रॉसनने आठ धावा नंतर यशपाल शर्माची विकेट झेलबादने घेतली.

भारताने पाचव्या विकेट गमावल्या नंतर फलंदाजीस आलेल्या कपिल देव आणि रॉजर बिन्नी यांनी ६० धावांच्या भागीदारीसह पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरू केली.

या बिकट परिस्थितीत कपिल देव हळू हळू आपल्या धाव जमवत होता . त्याने २६ व्या षटकात ५० धावांची मजल मारली, परंतु पुढच्या ५० धावा त्याने फक्त १० षटकात फटकावण्यासाठी उंच गियरमध्ये गेला.

भारतीय संघांच्या २६६ धावा मधील १७५ धावा या एकट्या कपिल देवने फटकावल्या होत्या. या धावा करत असताना त्याचा प्रसिद्ध ‘नटराज’ शॉट आजही लोकांच्या लक्षात आहे. कपिलने आपल्या शेवटच्या ७५ धावा ३८चेंडूंत आले

कपिलच्या या १७५ धावांमुळे अखेर झिम्बाब्वेचा ३१ धावांनी पराभव झाला. कपिल देवचा डाव नसता तर भारतने नक्कीच हा सामना गमावला असता. कपिल देव यांच्या ‘ नाबाद १७५’ धावा मुळे भारतीय संघाला असा विश्वास दिला की ते कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करू शकतात.

याच सामन्याबरोबर १९८३ च्या विश्वकरंडकच्या अंतिम सामन्यात पराक्रमी वेस्ट इंडीजला भारताने ४३ धावांनी पराभूत करून विश्वकरंडक जिंकून एक नवा इतिहास घडवला. या विजयामुळे भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला.

संकलन : न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा