नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांना आता रेल्वेत ५० सूट देण्यात येणार आहे.
५ हजार रुपयांपेक्षा कमी मासिक उत्पन्न असलेल्या तरुणांना स्लीपरच्या मूळ भाड्यामध्ये ५० टक्के सवलत देण्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली आहे. सामान्य रेल्वे सेवांसाठी विशेष बाब म्हणून ही सवलत देण्यात आली आहे. विशेष रेल्वे किंवा डब्यांसाठी ही सवलत मिळणार नाही.
महोत्सवाला पोहोचण्यासाठी ३०० किमीहून अधिक प्रवास करणाऱ्या व्यक्तींनी स्लीपर वर्गाच्या एकेरी भाड्याचे शुल्क भरल्यानंतर, त्यांना सवलतीचे परतीचे तिकीट दिले जाईल.
विविध राज्यांच्या मनुष्यबळ विकास विभागाच्या सचिवांकडून रेल्वेने निश्चित केलेल्या नमुन्यातील प्रमाणपत्र सादर केल्यानंतर ही सवलत दिली जाणार आहे.