एक दिवस POK मधील लोक म्हणतील आम्हाला भारतात सामील करा..

नवी दिल्ली, दि. १४ जून २०२० : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले आहेत की प्रतीक्षा करा, एक दिवस अशी वेळ येईल की पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील लोकही असे म्हणतील की त्यांना भारतात सामील व्हायचे आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जम्मू जनसंवाद रॅलीला संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले की, येत्या पाच वर्षांत जम्मू-काश्मीरचे चित्र इतके बदलून जाईल की स्वतःच पीओके कडून अशी मागणी होईल की आम्हाला पाकिस्तान सोबत रहायचे नाही आणि ज्या दिवशी असे घडेल त्या दिवशी आपल्या संसदेचा हेतू देखील पूर्णत्वास जाईल.

काश्मीरमध्ये आयएसआयएसचा ध्वज यापुढे दिसणार नाही

आपल्या भाषणादरम्यान संरक्षणमंत्र्यांनी अतिरेक्यांनी ठार केलेल्या सरपंच अजित पंडिता यांनाही श्रद्धांजली वाहिली. याशिवाय १९४७ मध्ये काश्मीर खोऱ्यात तिरंगा फडकवणाऱ्या मोहम्मद मकबूल शेरवानीचीही त्यांना आठवण झाली. संरक्षण मंत्री म्हणाले की पूर्वी कश्मीर मध्ये भारतापासून स्वातंत्र्य मिळण्यासाठी घोषणा केल्या जात होत्या तसेच पाकिस्तान आणि आयएसआयचे ध्वज देखील फडकवले जात होते. परंतु आता काश्मीर मध्ये केवळ भारताचा ध्वज फडकताना दिसेल.

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याचा उल्लेख करीत राजनाथ सिंह म्हणाले की, अनेकदा भाजप कार्यकर्त्यांना असेही वाटले होते की ही केवळ घोषणापत्रांची आश्वासने आहेत, परंतु आम्हाला पूर्ण बहुमत मिळताच आम्ही हा कलम संपविला. राजनाथसिंह म्हणाले की, भाजप कधीही राजकारणात विश्वासार्हतेचे संकट येऊ देणार नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा