एक रुपयात आरोग्य चाचणी लवकर सुरु होणार : राजेश टोपे

जालना : खातेवाटप जाहीर झाल्यानंतर राजेश टोपे यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण हे खाते मिळाले आहे. या खात्याची व्याप्ती आणि जनतेच्या मूलभूत सुविधांपैकी एक असलेल्या या आरोग्य खात्याला आपण न्याय देणार असल्याचा संकल्प आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे.
जालना येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी टोपे म्हणाले की, शिवसेनेच्या जाहीरनाम्यातील एक रुपयात संपूर्ण आरोग्य चाचणी या योजनेला लवकरच मूर्त स्वरूप देण्यात येणार आहे.
राज्यात आरोग्य विभागाला नवी दिशा देण्याचं काम आम्ही करु. सामान्य माणसाला हे सरकार आपलं वाटलं पाहिजे. प्रशासनिक पातळीवर देखील लक्ष दिले जाईल. डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. ती संख्या भरुन काढून चांगल्या वैद्यकीय सुविधा देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे, असेही टोपे यांनी सांगितलं.
आपल्याला राष्ट्रीय आरोग्य मिशनची अंमलबजावणी करावी लागणार आहे. तसेच आपल्याकडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण हे खाते आल्याने आपण समाधानी आहोत असेही टोपे यांनी यावेळी सांगितले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा