एका नवरदेवाबरोबर दोन बहिणींचे लग्न

मध्यप्रदेश : आजकालच्या युगात कुठली गोष्ट घडेल याचा काही नेम नाही. त्यात एकाच व्यक्तीने तीन-तीन विवाह केल्याचे प्रकार फार कमी ऐकायला मिळतात. मात्र मध्य प्रदेशातील भिंड शहरात असाच एक विचित्र प्रकार समोर आला आहे.
या लग्नात वर एक आणि वधू दोन असा अजब प्रकार पाहायला मिळाला. यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकाच मंडपात एकाच मुलासोबत दोन बहिणींचे लग्न झाले. नवऱ्याने आधी आपल्या पत्नीच्या बहिणीशी लग्न केले आणि त्यानंतर त्याच मंडपात पत्नीशी पुन्हा विवाह केला.
या अनोख्या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसते आहे. दिलीप असे या नवऱ्याचे नाव असून, ९ वर्षांपूर्वीच त्याचे विनीता नावाच्या महिलेशी लग्न झाले होते.
विनीता भिंड जिल्ह्यातील मेहगाव जिल्ह्यातील गुडावली गावची सरपंच आहे. दिलीप आणि विनीता यांना तीन अपत्ये आहेत.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे विनीताने स्वत: चं आपल्या नवऱ्याच्या दुसऱ्या विवाहासाठी परवानगी दिली. त्यामुळे दिलीपने विनीता यांची बहिण रचना हिच्याशी दुसरा विवाह केला. रचना ही विनिताची चुलत बहीण आहे. दिलीपच्या दुसर्‍या लग्नाच्यावेळी हातात हार घेऊन दोन वधू उपस्थित होत्या. दिलीपने एकाचवेळी दोन्ही वधूच्या गळ्यात हात घालत लग्न केले.

या कारणामुळे केला दुसरा विवाह
दरम्यान दुसऱ्या विवाहाबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिलीप यांनी, “माझी पहिली पत्नी विनिता हिची प्रकृती ठीक नसते. आमची मुलेही लहान आहेत, त्यांची काळजी घेण्यासाठी मला पुन्हा लग्न करावे लागले”, असे सांगितले. दरम्यान पहिल्या लग्नानंतर काही वर्षांनी दिलीपचे त्यांच्या मेहुणीवर प्रेम जडले. दिलीप यांनी स्वत: आपल्या पत्नीला याबाबत सांगितले, आणि तिच्या संमतीनं मेहुणीशी विवाह केला.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा