एकाच वेळेस २५ शाळेत नोकरी करणाऱ्या शिक्षिकेस अटक

लखनऊ, दि. ७ जून २०२०: उत्तर प्रदेशातील २५ शाळांमध्ये एकच शिक्षक नियुक्त झाल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. अनामिका शुक्ला यांचे नाव २५ शाळेतील एकाच पदावर होते आणि त्यासाठी त्यांनी १ कोटींचे वेतन देखील घेतले. हि माहिती मिळताच पोलिसांनी अनामिका शुक्ला यांना अटक केली. मंत्र्यांच्या सूचनेनंतर कासगंज पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला होता.

वस्तुतः मूलभूत शिक्षा विभागाने शिक्षकांचा डेटाबेस तयार करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर विभागाच्या २५ शाळांच्या यादीत अनामिका शुक्ला यांचे नाव आले. विभागाने त्वरित संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले.

मूलभूत शिक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार आता शिक्षकांचे डिजिटल डेटाबेस तयार केले जात आहेत आणि या प्रक्रियेदरम्यान केजीबीव्हीमध्ये कार्यरत पूर्णवेळ शिक्षक अमेठी, आंबेडकरनगर, रायबरेली, प्रयागराज, अलिगड आणि इतर जिल्ह्यात एकाच वेळी २५ शाळांमध्ये कार्यरत असल्याचे आढळले.

विभागाने यानंतर शिक्षिकेला नोटीस देखील पाठवली होती मात्र यानंतरही शिक्षिके कडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर कारवाई करत विभागाने शिक्षिकेचा पगार त्वरित थांबवला. सध्या या शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे.

एफआयआर नोंदविण्याचे शिक्षणमंत्र्यांचे आदेश

उत्तर प्रदेशचे मूलभूत शिक्षणमंत्री डॉ. सतीश द्विवेदी म्हणाले की, शिक्षिकेेविरूद्ध एफआयआर नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ते म्हणाले, ‘विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत आणि शिक्षिकेवरील आरोप खरे असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. आमचे सरकार सत्तेत आल्यापासून पारदर्शकतेसाठी डिजिटल डेटाबेस तयार केले जात आहेत. जर विभागाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असेल तर कारवाई केली जाईल. कराराच्या आधारे केजीबीव्ही शाळांमध्येही नेमणुका केल्या जातात. या शिक्षकाविषयीची माहिती विभाग तपासत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा