बंड यशस्वी झालं नसतं तर एकनाथ शिंदे डोक्यात गोळी झाडून घेणार होते, शिवसेना नेते दिपक केसरकर यांचा गौप्यस्फोट

मुंबई २१ जून २०२३: वर्षभरापूर्वी २० जून रोजी शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी झालं नसतं तर मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यावेळी स्वत:वर गोळी झाडली असती. शिंदे सरकारमधील शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या या खुलाशानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली.

आज (२१ जून, बुधवार) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, या केसरकरांच्या खुलाशानंतर पत्रकारांशी झालेल्या संवादात प्रश्न उपस्थित केला की, अशी मानसिक स्थिती असलेली व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कशी बसू शकते? ते राज्यासाठी धोकादायक आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आलेला आत्महत्येचा विचार, त्यांनी कसा लपवून ठेवला? मानसिक स्थिती ठीक नसलेल्या व्यक्तीवर महाराष्ट्र राज्याची जबाबदारी देणे योग्य नाही, असे संजय राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्या बंडाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मंगळवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी हा मोठा खुलासा केला. दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत ठाकरे गटाकडून २० जून हा दिवस ‘देशद्रोही दिन’ म्हणून साजरा केल्याचा खरपूस समाचार घेताना, तुम्ही कोणाला गद्दार म्हणता? एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी उठाव केलाय, असे ठणकावले. जेंव्हा-जेंव्हा उद्धव ठाकरे आश्वासन देऊन आम्हाला तोडायचे, तेव्हा आम्ही एकनाथ शिंदे यांच्याकडे जायचो. ते सर्वात महत्त्वाचे सदस्य होते पण त्यांचाही शिवसेनेच्या स्थापना दिनी (१९ जून) अपमान झाला. असे असतानाही त्यांनी चर्चेचा मार्ग मोकळा ठेवला होता, पण ते होऊ शकले नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा