निवडणूक आयोगाचा आदेश- कमलनाथ यांनी ४८ तासांच्या आत द्यावे स्पष्टीकरण

मध्य प्रदेश, २२ ऑक्टोबर २०२०: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मध्य प्रदेशच्या कॅबिनेट मंत्री इम्रती देवी यांना ‘आयटम’ असा उच्चार केल्यानं त्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. यानंतर राजकीय वर्तुळात चांगलाच गदारोळ माजला होता. विरोधक देखील त्यांच्यावर आक्रमक झाले होते. निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे ४८ तासांत जाब मागितला आहे.

काँग्रेसचे उमेदवार सुरेश राजे यांच्या समर्थनार्थ प्रचार करण्यासाठी कमलनाथ मध्य प्रदेशातील डबरा येथे गेले होते. या दरम्यान त्यांनी मंचावरून समोरील जनतेला संबोधित करत असे म्हटले होते की, सुरेंद्र राजेश आमचे उमेदवार आहेत, ते स्वभावाने आणि चारित्र्याने साधे व सरळ आहेत. हे त्याच्यासारखे नाही… काय आहे त्यांचं नाव? मी काय त्यांचं नाव घेऊ तुम्ही माझ्यापेक्षा त्यांना जास्त चांगले ओळखता. तुम्ही तर आधीच मला सावध केलं पाहिजे होतं की ‘ही काय आइटम आहे’.

त्यांच्या वक्तव्यावरून बरेच वादंग झाले. यावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की मला व्यक्तिशः भाषा आवडत नाही. मी कधीही त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करणार नाही.

राहुल गांधी या विधानावर असहमत

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या ‘आयटम’ विधानावर काँग्रेस नेते राहुल गांधी सहमत नाहीत. वायनाड भेटीदरम्यान राहुल गांधी म्हणाले की, मला अशी भाषा आवडत नाही, तसेच त्यांनी केलेल्या या विधानाचे देखील मी खंडन करत आहे.

मी का माफी मागू?

त्याच वेळी, कमलनाथ यांना राहुल गांधींच्या भाषणाबद्दल विचारले असता ते म्हणाले की हे राहुल गांधींचे मत आहे, मी कोणत्या संदर्भात म्हटले आहे ते मी आधीच सांगितले आहे. जेव्हा काँग्रेस नेते कमलनाथ यांना विचारले गेले की आपण माफी मागणार का? तर कमलनाथ म्हणाले मी का माफी मागावी? मी कालच ह्याबाबत स्पष्ट केलं होतं की जर माझ्या विधानामुळे कोणाला वाईट वाटत असेल तर त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा