माढा, दि.१९ ऑगस्ट २०२०: माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील सुरजा बोबडे यांची जिजाऊ ब्रिगेडच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे. शिवमती सुरजा बोबडे यांनी याअगोदर जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यांचे काम समाधानकारक व समाजाच्या हिताचे असून त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली.
सुरजा बोबडे यांनी शैक्षणिक,सामाजिक, राजकीय तसेच महिला सबलीकरणासाठी व सध्याच्या काळात मुलींवर होणारे अत्याचार संपविण्यासाठी मुलींना कराटे प्रशिक्षण देऊन मनोबल वाढविणे तसेच संघटनेतील जिजाऊची लेक वाघीण हा उद्देश सफल केला व संघटना वाढीसाठी भरीव कामगिरी केली आहे. यामुळे सुरजा बोबडे यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन बहुजनांच्या विकासाचा वसा सुरजा बोबडे यांनी घेतला आहे, असे यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या महासचिव सारिका अंबुरे यांनी आपले मत व्यक्त केले अाहे.
जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा माधुरीताई भदाणे,प्रदेश कार्याध्यक्षा नंदाताई शिंदे, याही यावेळी उपस्थित होत्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष मराठा सेवा संघ उत्तमराव माने, मराठा सेवा संघ सोलापूर जिल्हाध्यक्ष टी आर पाटील, संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय कार्याध्यक्ष नितीन खटके,प्रियाताई नागणे माजी जिल्हाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड पंढरपूर विभाग यांच्या हस्ते नूतन जिल्हाध्यक्ष सूरजा बोबडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील