नवी दिल्ली, दि. २ जून २०२०: कोरोना विषाणूच्या जागतिक साथीमुळे राज्यसभा निवडणुका तहकूब करण्याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे. या निवडणुका १९ जून रोजी होणार आहेत. कोविड -१९ च्या संदर्भात आयोगाने २६ मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुका तहकूब केल्या. या निवडणुकीची मतमोजणी १९ जून रोजी संध्याकाळी ५ वाजता होईल.
राज्यसभेच्या ५५ जागांसाठी २६ मार्च रोजी निवडणुका होणार होत्या पण ३७ उमेदवार आधीच निवडणूक न लढवता निवडून आले होते, तर १८ जागांसाठी निवडणुका होणार आहेत. या जागा आंध्र प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, मणिपूर, राजस्थान, गुजरात आणि मेघालयातील आहेत.
तीन महिन्यांनंतर निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा म्हणाले की, रिक्त झालेल्या राज्यसभेच्या ११८ जागांसाठी १९ जून रोजी निवडणुका होणार असून निवडणुकीचे निकालही त्याच दिवशी जाहीर करण्यात येतील.
या राज्यांत होतील निवडणुका
आंध्र प्रदेशातील चार, झारखंडमधील दोन, मध्य प्रदेशात तीन, मणिपूरमधील एक, मेघालयात एक आणि राजस्थानमधील तीन जागांवर निवडणुका होणार आहेत. १९ जून रोजी सकाळी ९ वाजता या जागांसाठी मतदान सुरू होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी