वॉशिंग्टन, ३ नोव्हेंबर २०२०: अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. ट्रम्प पुन्हा सत्तेत येऊ शकतील की नाही याकडं लोकांचं लक्ष लागलं आहे. अनेक राजकीय तज्ञांचं मत आहे की, डोनाल्ड ट्रम्प कदाचित निवडणूक हरू शकतात. यावेळी जो बिडेन यांचं पारडं जड असल्याचं सांगितलं जात आहे. जर तसं झालं तर १९९२ नंतर प्रथमच अमेरिकेत अध्यक्ष निवडून येण्याच्या एका विशिष्ट पॅटर्नमध्ये खंड पडंल. कारण, आतापर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निवडून आले आहे त्यांनी सलग दोन वेळा हे पद भूषवलं आहे.
१९९२ मध्ये बिल क्लिंटन यांनी तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांचा पराभव केला. दरम्यान, अशीही एक बातमी आहे की राष्ट्रपतिपदाची निवडणूक संपल्यानंतर ट्रम्प वेळेपूर्वी विजय घोषित करतील.
तथापि, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे सर्व अहवाल फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, अशी कोणतीही योजना आपण आखत नाही. तथापि, निवडणुका होताच कायदेशीर लढाईची तयारी असल्याचे त्याने निश्चितपणे सांगितले आहे.
निवडणुकीच्या रात्री आपण वेळेपूर्वी विजयाची घोषणा करू शकतो का, असं अमेरिकेच्या अध्यक्षांना विचारलं गेलं होतं. ते म्हणाले, नाही, ही चुकीची बातमी आहे. ट्रम्प पुढं म्हणाले, ‘निवडणुकीनंतर मतपत्रिका गोळा करणं हे खूप धोकादायक आहे. मला असं वाटतं की निवडणुका संपल्यानंतर लोकांना किंवा राज्यांना बऱ्याच काळासाठी बॅलेट पेपर्स सादर करण्याची परवानगी दिली जाते तेव्हा ते धोकादायक आहे.’
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर टीका
अनेक मतदान क्षेत्रातील निवडणुका झाल्यानंतर बॅलेट पेपर्स मिळू देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर ट्रम्प यांनी टीका केली आणि म्हणाले की, “निवडणूक होईल त्याच रात्री आम्ही आमच्या वकीलांसमवेत तयार असू.”
टपाल निवडणुकीत व्यापकपणे होणार्या घोटाळ्याची चिंता व्यक्त करताना ते म्हणाले, “मला वाटतं की त्यात मोठा धोका आहे.” यामुळं मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊ शकते आणि या मतपत्रांचा गैरवापर होऊ शकतो. ही एक धोकादायक गोष्ट आहे की, संगणकाच्या आधुनिक काळातही आपल्याला निवडणुकीच्या रात्रीच निकाल माहित नसतो.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे