हिवाळ्यात इलेक्ट्रिक वाहनांना करावा लागणार बॅटरिच्या समस्येचा सामना

मुंबई, २७ ऑक्टोबर २०२२ : पर्यावरण पूरक व पेट्रोल-डिझेल पेक्षा परवडत असल्याने लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत आहे. त्यामुळे हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत आहे. परंतु इलेक्ट्रिक वाहनांना वेगवेगळ्या हवामानात काय काय समस्या येऊ शकतात याची माहिती सर्वसामान्यांना खूप कमी आहे.

सध्या थंडी वाढत असून या थंडीमुळे इलेक्ट्रिक वाहनांतही काही समस्या येऊ शकतात. थंडीमुळे इंजिन जास्त थंड झाल्याने गाडी लवकर सुरू होत नसल्याच्या समस्येचा अनेकांनी सामना केला असेल. इंजिन गाड्यांप्रमाणे इलेक्ट्रिक गाड्यांनाही थंडीत काही समस्या जाणवतात.

मुख्यतः इलेक्ट्रिक वाहनातील बॅटरीच्या समस्या हिवाळ्यात डोके वर काढतात. इलेक्ट्रिक वाहनातील बॅटरी ही स्मार्टफोनमधील बॅटरीसारखीच असते. थंडीत जसे कधीकधी मोबाईलमध्ये काही अडचणी जाणवतात तसेच इलेक्ट्रिक गाड्यांच्या कार्यक्षमतेतही काही समस्या उद्भवू शकतात. हे टाळण्यासाठी तुम्हाला या वाहनांची आणि बॅटरीची काळजी घ्यावी लागेल.

काही एक्सपर्ट च्या म्हणण्यानुसार, थंडीत फास्ट चार्जिंगसाठी जास्त व्होल्टेज दिल्यास बॅटरी खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे हिवाळ्यात ईव्ही फास्ट चार्ज करू नये.

हिवाळ्यात इलेक्ट्रिक वाहने स्लो चार्ज केली पाहिजे, जेणेकरून बॅटरीचे नुकसान होणार नाही. हिवाळ्यात रात्रीच्या वेळी इलेक्ट्रिक वाहनांसाठी लेव्हल १ चार्जिंग वापरावे. थंडीत बॅटरीचे इलेक्ट्रोलाईट मंद होतात. त्यामुळे चार्जिंगला जास्त वेळ लागतो. त्यामुळे हिवाळ्यात तुम्ही बॅटरी चार्जिंगसाठी जास्त वेळ दिला पाहिजे.

हिवाळ्यात इलेक्ट्रिक गाडी जास्त वेगाने चालवण्याऐवजी इको मोडवर वापरावी. ज्यामुळे बॅटरीची शक्ती वाचवली जाते. थंडीत इको मोडवर गाडी चालवणे हा चांगला पर्याय आहे. गाडी पार्क करण्यासाठी गॅरेज असेल तर रात्री आपली गाडी तिथे पार्क केली पाहिजे. उष्ण ठिकाणी गाडी पार्क केल्याने बॅटरीच्या समस्या निर्माण होणार नाही. आपले इलेक्ट्रिक वाहन डिस्चार्ज होऊ देऊ नका. कारण यामुळे बॅटरीत अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

राज्यात आता थंडीची चाहूल लागली असून, अनेक भागात तापमान कमी झाल्याने चांगलाच गारठा जाणवत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा