पुणे, दि.८ मे २०२०: पुणे जिल्ह्यातील को-ऑपरेटिव्ह सोसायट्यांना १०हजारापेक्षा अधिक वीजबिल भरण्यासाठी “आरटीजीएस”ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अगोदर महावितरने ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी ऑनलाइन सेवा उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे ग्राहकांना वीजबिल भरणे सोपे होणार आहे. अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
जेव्हा पासून लॉक डाऊन सुरू झाला आहे. तेव्हापासून बँकींग व्यवहारांवर परिणाम झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. ही अडचण लक्षात घेऊन को-आॅपरेटीव्ह हौसींग सोसायट्यांसाठी महावितरणने १० हजार रुपयांपेक्षा अधिक वीजबिल भरण्यासाठी ‘आरटीजीएस’ सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शिवाय या सोबत सिंगल किंवा थ्रीफेज घरगुती वीजग्राहकांनाही आता १० हजारांपेक्षा अधिक वीजबिलांची रक्कम ‘आरटीजीएस’द्वारे भरता येणार आहे.
ऑनलाईनद्वारे क्रेडीट कार्ड, नेटबॅकिंग, डेबीट कार्ड, गुगलपे, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेट आदींद्वारे वीजबिल भरण्याची सुविधा पूर्वीप्रमाणेच सुरु राहणार असून घरगुती ग्राहक व को-आॅपरेटीव्ह हौसींग सोसायट्यांना 10 हजारांपेक्षा अधिक रकमेचा ‘आरटीजीएस’द्वारे भरणा करण्यासाठी त्यांच्या वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याची माहिती देण्यात येणार आहे.
शिवाय आपल्या मोबाईल क्रमांकावरून ९९३०३९९३०३ क्रमांकावर MREG (स्पेस) (१२अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून ‘एसएमएस’ करावा. याशिवाय www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल अॅपद्वारे मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: