नाशिक, ११ एप्रिल २०२३: शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या दुर्गशोध अभ्यास मोहिमेत रामशेजच्या नैसर्गिक कातीव अभेध कड्याच्या पोटात एकूण ११ गुहा आढळून आल्या आहेत. त्याबरोबर चारही बाजूंनी अतिशय दुर्मिळ वनस्पती, वनौषधी वृक्ष व विविध पक्षी आढळून आले आहे. कडाक्याच्या उन्हात यावेळी दुर्गसंवर्धकांनी तीन गट तयार करून दिवसभरात ही मोहीम पूर्ण केली.
अजिंक्य दुर्ग रामशेजच्या २३ वर्ष अभ्यासपूर्ण पद्धतीने अखंडित दुर्गसंवर्धन मोहिमा करून येथील झुडपात मातीत नष्ट होणारा ऐतिहासिक ठेवा, विविध जलस्रोत, दुर्मिळ झाडे, दुर्गजागृतीसाठी अविरतपणे राबत आहेत. मोहिमेच्या अखेरीस येत्या १४ मे रोजी रामशेजच्या माथ्यावर गोमुखी द्वारात होणाऱ्या छत्रपती शंभूराजे जन्मोत्सव नियोजन बैठकीत विविध जबाबदारीचे प्रयोजन करण्यात आले आहे.
यावेळी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या रामशेज दुर्ग अभ्यास शोधमोहीमेत संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ, भुषण औटे, किरण दांडगे, पर्यावरण वृक्ष अभ्यासक भारत पिंगळे, शिवाजी धोंगडे, मनोज अहिरे, दुर्गसंवर्धक हेमंत पाटील, वैभव मावळकर, राम पाटील, कार्तिक बोगावर हे सर्व मान्यवर उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर