इस्राइलमध्ये सापडली अकराशे वर्षापूर्वीची ऐतिहासिक इस्लामिक नाणी

इस्राइल, २५ ऑगस्ट २०२०: बर्‍याच वेळा असे घडते की उत्खनना दरम्यान अशा काही दुर्मिळ गोष्टी सापडतात ज्याचे सर्वांना आश्चर्य वाटते. इस्रायलमध्येही असेच दृश्य पाहिले गेले. येथील उत्खननात ११०० वर्षांपूर्वीची दुर्मिळ नाणी सापडली आहेत.

 

खरं तर, इस्त्रायली पुरातत्व शास्त्रज्ञांनी सोमवारी जाहीर केले की, शहराजवळील संरक्षित मालमत्ता उत्खनना दरम्यान त्यांना इस्लामिक काळातील सोन्याच्या नाण्यांचा खजिना सापडला आहे. ‘टाइम्स ऑफ इस्त्राईल’च्या वृत्तानुसार, ही नाणी अकराशे वर्षांपूर्वीची असावीत. एकूण, सोन्याची ४२५ नाणी सापडली आहेत.

इस्त्रायली पुरातत्व शास्त्रज्ञ लियात नदाव-झिव आणि एली हदाद यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे की उत्खननात एकूण ४२५ नाणी सापडली असून ती संपूर्ण सोन्याने बनविली आहेत. यापैकी बहुतेक ११०० वर्षांपूर्वीच्या अब्बासी काळातील नाणी आहेत.

 

नाणे मिळालेल्या स्वयंसेवकांपैकी एकाने सांगितले की ते आश्चर्यकारक आहे. मी जमिनीवर खोदले तेव्हा मला खूप पातळ पाने दिसली. मी पुन्हा पाहिले तेव्हा मला दिसले की ही सोन्याची नाणी आहेत. खरोखर हे रोमांचक दृष्य होते.

इस्त्राईलच्या पुरातत्व विभाग प्राधिकरणाच्या संचालकांनी एका निवेदनात म्हटले आहे की ११०० वर्षांपूर्वी एखाद्याने नाणी जमिनीत पुरल्याचा अंदाज आहे. जिथे ही नाणी आढळली, त्या भागात त्या काळी बाजार असे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा